Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाICC T20 Ranking : टॉप १० मध्ये 'हा' एकमेव भारतीय खेळाडू

ICC T20 Ranking : टॉप १० मध्ये ‘हा’ एकमेव भारतीय खेळाडू

मुंबई । Mumbai

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतीच टी २० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) समावेश करण्यात आला असून या रँकिंगमध्ये ८०५ रेटिंग गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच टॉप १० मध्ये विराजमान होणार तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे…

- Advertisement -

त्यासोबतच पाकिस्तान (Pakistan) संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) पहिल्या स्थानावर असून यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) तिसऱ्या स्थानावर आहे.

तर चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज एडम मार्करम (Adam Markram) आहे. तसेच इंग्लंडचा (England) आघाडीचा डावखुरा फलंदाज डेविड मलान (David Malan) पाचव्या तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅरॉन फिंच (Aaron finch) सहाव्या स्थानावर आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या