Friday, May 31, 2024
Homeदेश विदेशभारताचं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य - पंतप्रधान मोदी

भारताचं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली –

भारतानं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं आहे. जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसर्‍या देशाविरोधात

- Advertisement -

नसतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान त्यांनी संयुक्त राष्ट्रीय महासभेला संबोधित केलं.

ते म्हणाले, भारतानं कायम विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं आहे. भारत एक असा देश आहे ज्याने आपले 50 शूर जवान जगातील विविध शांतता मोहिमेवर पाठवले आहेत. भारताने कायम संपूर्ण मानव जातीच्या हिताचा विचार केला आहे. भारतानं आपला स्वार्थ पाहिला नाही, भारताची धोरणं कायम याने प्रेरित राहिली आहेत. महामारीच्या या कठीण काळातही भारताची फार्मा इंडस्ट्रीने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली आहेत . असंही मोदी यावेळी म्हणाले.

संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी

संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करा अन्यथा विश्वासार्हता संपेल. करोनाची साथ हे जागतिक संकट आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून आपण या करोनाशी लढा देतो आहे. ही आपण प्रत्येकाने आत्ममंथन करण्याची वेळ आहे. जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांमध्ये संयुक्त राष्ट्राने कार्यपद्धतीत सुधारणा केली पाहिजे असं मोदींनी म्हटलं आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा देश आहे. भारतात जगातले 18 टक्के लोक वास्तव्य करतात. हा एक असा देश आहे ज्या देशाला विविध भाषा, पंथ आणि विचारधारांची परंपरा आहे. भारतात होणार्‍या बदलांचा प्रभाव हा जगावर होतो. अशा देशाला किती काळ वाट बघावी लागणार? संयुक्त राष्ट्र भारताला निर्णय प्रक्रियेत कधी घेणार? हा प्रश्नही मोदींनी विचारला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या