नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. सततच्या दहशतवादी कारवायांमुळे या सर्वांच्या मागे असलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरातून केली जात आहेत. असे असले तरी पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. अशा परिस्थितीतही पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच असून पाकिस्तानच्या हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्यात येत आहे. भारतीय लष्कराची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झालाय. मिळालेल्या महितीनुसार, गेल्या दोन दिवसांत दोनदा वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. पाकिस्ताचा नापाक प्रयत्न भारतीय तंत्रज्ञान तज्ञांनी हाणून पाडलाय.
भारतानेही पाकिस्तानची डिजिटल कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भारताने १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घातल्यानंतर आता भारताने पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा एम. आसिफ यांच्या एक्स अकाऊंटला भारतामध्ये ब्लॉक केले आहे. जम्मू काश्मीरबाबत चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्याने तसेच भारतामध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात त्यांनी भारत कधीही लष्करी करवाई करेल. अशा परिस्थितीत सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलेय. ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल सरकारला माहिती दिली आहे, त्यानंतर पाकिस्तान सतर्क झालाय.
त्याआधी पाकिस्तानी सैन्याने सलग पाचव्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘२८-२९ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही चिथावणीशिवाय, कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर (LoC) तसेच अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा