नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्यासह देशातील अनेक राज्यांना सध्या अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. बदलत्या हवामानाचा फटका आता विमानसेवेलाही बसला आहे. दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला. दिल्लीतून श्रीनगरला जाणारे विमान वादळी वाऱ्याच्या कचाट्यात आल्याने श्रीनगर विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वीज कोसळल्याने विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीबद्दल हवाई वाहतूक नियंत्रणाला माहिती दिली आणि 200हून अधिक प्रवासी असलेले इंडिगो विमानाचे इमर्जेन्सी लँडिंग करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इंडिगोच्या विमान क्रमांक 6E-2142 खराब हवामानातून जात असताना अचानक वीजेचे जोरदार झटके जाणवले. या घटनेचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून, विमानात घाबरलेले प्रवासी प्रार्थना करताना दिसत आहेत. काही प्रवासी आक्रोश करतानाही दिसत आहेत. इंडिगो विमानच्या या उड्डाणाचे ट्रॅकिंग पाहिल्यास हे विमान वादळात सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे. आकाशातील वादळात विमान गोल गोल फिरत असल्याचे लक्षात येताच विमानातील क्रु मेंबर आणि पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
IndiGo issues press statement – “IndiGo flight 6E 2142 operating from Delhi to Srinagar encountered sudden hailstorm en route. The flight and cabin crew followed established protocol and the aircraft landed safely in Srinagar. The airport team attended to the customers after… pic.twitter.com/clliOB3lwt
— ANI (@ANI) May 21, 2025
इंडिगोने याबाबत अधिकृत निवेदन जाहीर केले असून त्यात म्हंटले आहे की, दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान 6E-2142 ला अचानक विजेचे धक्के जाणवले. यानंतर विमान आणि केबिन क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमान सायंकाळी ६.३० वाजता श्रीनगरमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमान उतरवल्यानंतर ग्राऊंड स्टाफने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. तसेच विमानाची आणि देखभालीनंतर विमान उड्डाण करेल, असे इंडिगोने म्हटले आहे.
दिल्ली ते श्रीनगर हवाई मार्गावर विमानाचा प्रवास सुरू असताना, बर्फाचा पाऊस आणि गारा पडत होत्या. त्यामध्ये, विमानाच्या पुढील बाजुच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. विमान आकाशात हेलकावे घेत असताना प्रवाशांची धाकधूक वाढली होती, तर काही प्रवाशांनी आरडाओरडही सुरू केली. मात्र, फ्लाईट पायलट आणि केब्रिन क्रू मेंबर्सने सर्वच सूचना व नियमांचे पालन करत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. त्यामुळे, सर्व प्रवाशांसह विमानाचे सुखरुप लँडिंग झाले आहे.