Monday, June 24, 2024
Homeनाशिकअभूतपूर्व प्रतिसादात इंदिरानगर प्रॉपर्टी एक्सपोची सांगता

अभूतपूर्व प्रतिसादात इंदिरानगर प्रॉपर्टी एक्सपोची सांगता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

इंदिरानगर व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘देशदूत’ आयोजित तसेच क्रीश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रायोजित व सहप्रयोजक रोहन एंटरप्राइजेस असलेल्या ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो 2024’ चा शानदार समारोप करण्यात आला.

प्रदर्शनाच्या तीनही दिवस इंदिरानगर व परिसरातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या ‘देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. एक्स्पोचे फायनान्स पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र तर, पर्यावरणीय पार्टनर पपायाज् नर्सरी हे होते.

‘प्रॉपर्टी एक्स्पो’मध्ये सहभागी स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते योगदान सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दै.’देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी स्टॉल धारकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी एक्स्पोला अंकुर पब्लिसिटीचे सुभाष गांधी यांनी भेट दिली त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, सचिन गीते, अशोकाचे जनसंपर्क अधिकारी व्योम श्रीवास्तव, संताजी संकुलचे अध्यक्ष ओमकार देवरगावकर, ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, व्यवस्थापक मिलिंद वैद्य, ग्रामीण व्यवस्थापक सचिन कापडणी, मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, समीर पराशरे, आनंद कदम, प्रशांत अहिरे, समीर कवी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या