Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशइंडोनेशियामध्ये उड्डाणानंतर विमान बेपत्ता; विमानात ५० हून अधिक प्रवाशी

इंडोनेशियामध्ये उड्डाणानंतर विमान बेपत्ता; विमानात ५० हून अधिक प्रवाशी

दिल्ली | Delhi

इंडोनेशियाहून उड्डाण केलेल्या विमानाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडोनेशियाच्या जकार्ताहून उड्डाण केलेले विमान रडारवरून एकाएकी गायब झाले आहेत. या विमानाचा उड्डाणानंतर अचानक संपर्क तुटल्याने काहीतरी भयानक गोष्ट घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

श्रीविजय एअर फ्लाइट 737 (The Sriwijaya Air Boeing 737) मध्ये ५० हून अधिक प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. या विमानाच्या लोकेशनची माहिती मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी अभियान सुरू करण्यात आलं आहे.

आतापर्यंत विमान अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाण घेतल्यानंतर 4 मिनिटांत ते 10,000 फूटांपेक्षा अधिक उंचावर पोहोचले आणि त्यानंतर या विमानाशी एकाएकी संपर्क तुटला. त्यानंतर सर्व विमानतळावरील यंत्रणा या विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अजूनपर्यंत तरी या विमानाशी काहीही संपर्क होऊ शकलेला नाही. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण घेतल्यामुळे एक उड्डाण बेपत्ता असल्याची माहिती मिळताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे. हे विमान नेमकं कोणत्या दिशेने गेलं याचा शोध घेतला जात आहे. मात्र विमानासोबत संपर्क तुटल्याने अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या