नवी दिल्ली | New Delhi
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Attack) पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांवर हल्ला करत त्यांचा जीव घेतला होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानला (Pakistan) जाणाऱ्या सिंधू नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये उमटत असून, येथील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. पाकिस्तानमधील आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्र्याचे घरच पेटवून दिले आहे. याठिकाणची परिस्थिती हाताबाहेर गेली असून, या आंदोलनात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
भारताने (India) पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी केली आहे. एकीकडे भारताने सिंधु नदीचे पाणी अडवले आहे. तर दुसरीकडेसरकारच्या सहा कालवे प्रकल्पाला सिंध प्रांतातील लोकांनी (People) विरोध दर्शविला आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे आंदोलकांनी पाकिस्तानातील सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचे नौशहरो जिल्ह्यातील घरच पेटवून दिले. यावेळी त्यांच्या घराची मोठी नासधूस करण्यात आली. तर आंदोलकांच्या हाती बंदुका देखील होत्या. या बंदुकातून अनेकांनी हवेत गोळीबार (Firing) केला. याशिवाय गृहमंत्र्याच्या (Home Minister) घरातील काही लोकांना मारहाण करत आंदोलकांनी शेकडो वाहने जाळली.
तसेच संतप्त झालेल्या आंदोलकांनी (Protesters) काही ट्रक देखील लुटले आणि त्यातील तीन ट्रक पेटवून दिले. यामध्ये एका तेल टँकरचाही समावेश आहे. चोलिस्तानमध्ये सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर सहा कालवे बांधण्याची योजना आखत आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) यांच्यातही तणाव वाढत आहे. याशिवाय आंदोलकांनी पोलिसांची वाहने देखील पेटवून दिली असून, या आंदोलनात दोन आंदोलकाचा मृत्यू (Death) झाला आहे. तर एक डीएसपी आणि इतर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पाकिस्तानात आर्मी स्कूलवर आत्मघातकी हल्ला
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी सकाळी आर्मी स्कूल बसवर आत्मघातकी हल्ला झाला. यामध्ये तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातात ३५ मुले जखमीही झाली असून, ही घटना खुजदार जिल्ह्यात घडली आहे. बसमधून ४० मुले सैनिक स्कूलला जात होती. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानी सैन्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे.