Saturday, May 18, 2024
Homeनगरनगर: उद्योगपती चोपडाविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी दाखल

नगर: उद्योगपती चोपडाविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मजुराला मारहाण केल्याचे प्रकरण भोवले

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतातील मजुरीचे काम करणार्‍या मजुरांना मारहाण केल्याप्रकरणी शहरातील उद्योगपती राजेंद्र कांतीलाल चोपडा (रा. शेंडी ता. नगर) यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, शहरातील उद्योगपती राजेंद्र चोपडा यांची नगर तालुक्यातील शेंडी (पोखर्डी) येथे शेत जमीन आहे. या शेतामध्ये शेती काम करण्यासाठी मजुर होते. एक महिला मजुर केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गुरुवारी (दि. 5) उद्योगपतीकडे पोखर्डी येथे गेल्या. केलेल्या कामाचे पैसेची मागणी त्या महिला मजुराने चोपडा यांच्याकडे केली.

यावरून मजुराला चोपडा यांनी शिवीगाळ केली. चोपडा यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांनी त्या महिलेला काठीने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण झालेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (दि. 07) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या