Tuesday, May 20, 2025
Homeधुळेउद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल : बारा वर्ष केवळ प्रस्तावच पाठविलेत...

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल : बारा वर्ष केवळ प्रस्तावच पाठविलेत का?

धुळे । Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

कोणताही विषय विचारला की प्रस्ताव पाठविला (proposal has been sent) आहे, असे उत्तर दिले जाते. मग अधिकार्‍यांनी (authorities) इतकी वर्ष केवळ प्रस्ताव पाठविण्याचेच (Only work of sending proposal) काम केले काय? असा उपरोधिक सवाल (Ironic question) खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला.

गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाचे विभागीय कार्यालय एका रेस्ट हाऊसमध्ये सुरु असून याची लाज लाटत नाही काय? असेही ते म्हणाले. जिल्हा दौर्‍यावर आलेले मंत्री सामंत यांनी अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आता कुठे उद्योग खाते हाती घेतले आहे. अभ्यास करायला थोडा वेळ लागेल पण या खात्याला आपण नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करु.

अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत पुढे आलेल्या मुद्यांनुसार काही निर्णय घेवून आपण जातो आहोत. यात पिंपळनेरच्या एमआयडीचे लवकरच उद्घाटन केले जाईल. धुळ्या लगतच्या रावेर औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादन कामाला गती दिली जाईल. वनविभागाशी निगडीत प्रश्न सोडविले जातील. धुळ्यातील औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र अग्निशामक केंद्रासाठी निधी दिला जाईल. तसेच नळपाणी पुरवठा योजनेसाठी नव्याने प्रस्तावित योजनेला मंजूरी दिली जाईल असेही ते म्हणाले.

लवकरच नवीन कायदा

बर्‍याचदा नवीन उद्योग प्रकल्प येणार असल्याची कुणकूण लागताच काही जण स्वस्त दरात जमीनी खरेदी करुन ठेवतात. नंतर याच जमीनी प्रकल्पात घेतांना त्यांना जास्तीचा मोबदला मिळतो. म्हणजेच मूळ जमीन मालक यापासून वंचित राहतो. यासाठी थेट जमीन मालकाला पैसे मिळतील असा कायदा लवकरच पारीत करणार आहोत. यासाठी उद्योग प्रकल्प सुरु होण्याच्या एक वर्षा आधीचे जमीन खरेदीचे व्यवहार तपासले जातील, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.

पत्रकारांनी काही प्रश्न छेडले असता मंत्री सामंत म्हणाले, गणोत्सवानंतर आपण पुन्हा धुळ्यात येवून थेट औद्योगिक वसाहतीमध्येच बैठक घेवून म्हणजेच त्या ठिकाणच्या समस्यांचीही कल्पना येईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...