Saturday, May 4, 2024
Homeनगरमहागाईच्या भडक्याने सुप्यातील कामगारवर्ग मेटाकुटीला

महागाईच्या भडक्याने सुप्यातील कामगारवर्ग मेटाकुटीला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

ऐन सनांच्या दिवसात इंधनाच्या दरात गेल्या दहा दिवसात नऊ वेळा दरवाढ झाल्याने सामान्य नागरिक या दरवाढीच्या भडक्यात चांगलाच होरपळून निघत आहे. प्रामुख्याने सुपा औद्योगिक वसाहतीतल कामगार वर्ग, रोजंदारीचे मजुर, शेतकरी मेटाकूटीला आले आहेत.

- Advertisement -

होळी. धुलीवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा हे सण व आता सुरु होत आसलेल्या गावगावच्या जत्रा अशा ऐन सनासुधीच्या काळात रोज इंधन दर वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने कामगार वर्गाला दुचाक्या वापरने मुश्किल झाले आहे. इंधन दरवाढीने वाहतु दरातही वाढ झाल्याने सामान्य नागारिक चांगलेच हैराण झाले आहेत. रविवारी पारनेर तालुक्यात पेट्रोल 118.09 पैसे तर डिझेल 100.82 पैसे दराने विकले जात होते.

तिच अवस्था गाँस टाकीचीही झाली आहे. घरगुती वापराची 14 किलोची गाँस टाकी 959 रुपयाला झाली असुन व्यावसायिक टाकी 2273 रुपयाला विकली जात आहे. ज्यांचे हातावर पोट आहे किंवा ज्या महिला मोलमजुरी करतात त्यांनी गॅस वापरने बंद केले आहे. शेतीच्या मशागतींचा हा कालावधी असून डिझेल दरवाढीने मशागतींचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी चिंतेंत आहेत.

देशातील पाच राज्याच्या निवडणूका संपल्या आणि इंधन दरवाढीला जोरदार सुरवात झाली. सलग नऊ दहा दिवस झाले रोजच दरवाढ होत आहे. देशाचे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनावर कर वाढवून नुकसान भरपाई कारण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यात सामान्य नागरिक, गोरगरीब मोलमजुर, शेतकरी यांचा जीव मात्र टांगणीला लागत असल्याचे नागरीक सांगत आहेत.

इंधन दरवाढीचा फटका जसा सामान्य किरकोळ ग्राहकाना बसतो. तसेच नुकसान पंप चालक व एजन्सिज चालकानांही बसतो. इंधन महागले की, नागरीक काटकसर करतात. पर्यायाने खप ( विक्री ) कमी होते, विक्रेत्यांना तुटपुंजे कमिशन मिळते. तर दरवाढीमुळे भांडवल जास्त गुंतते या सर्वाचा ताळेबंद जुळवताना पंपचालकांनाही मोठी कसरत करावी लागते.

– अभिजीत पठारे, संचालक दौलत सर्वीस स्टेशन सुपा

- Advertisment -

ताज्या बातम्या