Sunday, September 29, 2024
Homeधुळेधुळ्यात मनाई आदेश जारी ; पोलीस बंदोबस्त तैनात

धुळ्यात मनाई आदेश जारी ; पोलीस बंदोबस्त तैनात

धुळे । प्रतिनिधी dhule

शनिवारी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीसाठी पोलीस (police) यंत्रणा सक्षम आहे. धुळे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सीआरपीसी 144 (2) चे मनाई आदेश पारीत करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक संजय बारकुंड (Superintendent of Police Sanjay Barkund) यांनी दिली आहे.

- Advertisement -

शहर पोलीस स्टेशन हद्दीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचे उद्देशाने कटकारस्थान केल्यावरुन गुन्हा दाखल आहे. या घटनेबाबत सकल हिंदू समाजातर्फे 10 जून रोजी सकाळी 9 वाजता हिंदु जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे. जन आक्रोश मोर्चाचे अनुषंगाने सोशल मीडियावर काही लोक धुळे बंद, धुळयात मोर्चा आहे. याबाबत व्हिडीओ तयार करुन व्हायरल करीत आहे. त्यातील काही व्हिडीओ हे आक्रमक दिसून येत आहे, ते आपल्या जिल्ह्याचे, आपल्या राज्याचे नाही. जुने इतर व्हिडीओ बनवून मोर्चा संबंधाने व्हायरल करीत आहे. असे व्हिडीओ कोणीही फॉरवर्ड करु नये, ज्यामुळे अफवा पसरविली जाणार नाही व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. असे व्हिडीओ कोणी व्हायरल केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल. धुळ्यात सद्या शांतता आहे. अशीच शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे. कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. सत्यपरिस्थितीची आपण पडताळणी करावी. शनिवारी निघणार्‍या मिरवणुकीबाबत पोलीस यंत्रणा सक्षम आहे. नागरीकांनी शांतता पाळावी असे आवाहन श्री.बारकुंड यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या