Wednesday, May 22, 2024
Homeजळगावशहापूरच्या "त्या " अपघातातील जखमी विद्यार्थीनीचा रूग्णालयात मृत्यू

शहापूरच्या “त्या ” अपघातातील जखमी विद्यार्थीनीचा रूग्णालयात मृत्यू

बुरहानपूर Burhanpur

23 ऑगस्ट रोजी इंदूर इच्छापूर महामार्गावरील (Indore Ichchapur Highway) शाहपूर (Shahapur) रोडवर ऑटो आयशर वाहनाच्या धडकेत दोन विद्यार्थिनी आणि ऑटोचालक ठार झाले. या अपघातात (accident) इतर काही विद्यार्थिनीही जखमी (Injured student) झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका विद्यार्थिनी पल्लवी महाजन रा. बांबरा हिचाही शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू (Death during treatment) झाला. अपघातात एकूण 18 जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

पल्लवी महाजनही विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होती.

23 ऑगस्ट रोजी विवेकानंद कॉलेजच्या आधी इंदूर-इच्छापूर महामार्गावरील हनुमान मंदिराजवळ विद्यार्थिनींनी भरलेल्या ऑटो वाहनाला आयसर चालकाने धडक दिली. वाहन बुरहानपूरहून शाहपूरच्या दिशेने जात होते, तर ऑटोमधील विद्यार्थिनी कॉलेजला जात होत्या. या अपघातात सुमारे 18 जण जखमी झाले आहेत.

तर दोन विद्यार्थिनी विद्याचे वडील तुकाराम बारी, पूजा रा. बांबरा आणि ऑटोचालक दिनेशचे वडील अर्जुन महाजन यांचा मृत्यू झाला होता. इतर जखमी विद्यार्थिनींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पल्लवीचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या