Monday, June 24, 2024
Homeनाशिकअरिंगळे व बलकवडे यांच्याकडून जरांगेच्या तब्येतीची विचारपूस

अरिंगळे व बलकवडे यांच्याकडून जरांगेच्या तब्येतीची विचारपूस

नाशिक रोड |प्रतिनिधी

- Advertisement -

मराठा आरक्षणाचे सर्वेसेवा मनोज जरांगे पाटील हे सध्या संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची नाशिक रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे व त्यांच्या सहकार्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले होते त्यानंतर राज्य शासनाने हस्तक्षेप करून त्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या परिणामी मागण्या मान्य झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी तीन दिवसांपूर्वीच आपले उपोषण मागे घेतले, त्यानंतर त्यांचे वजन घटले व तब्येतीवर परिणाम झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री झाला जीवघेणा हल्ला; दोन्ही गटात तुंबळ हाणामारी

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जात आहे नाशिक रोड येथील कार्यकर्त्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन विचारपूस केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे तसेच बिजनेस बँकेचे संचालक गोरख बलकवडे शिवसेनेचे नेते जगन आगळे त्याचप्रमाणे डॉक्टर जाकिर शेख आधी उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या