Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजन'इनसाईड द शॅडो' शॉर्ट फिल्मला चार पारितोषिके

‘इनसाईड द शॅडो’ शॉर्ट फिल्मला चार पारितोषिके

नाशिक | Nashik

इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टिवलमध्ये (Indian Short Cinema Film Festival) ‘इनसाईड द शॅडो’ (INSIDE THE SHADOW) या शॉर्ट फिल्मला चार पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे या शॉर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या संपुर्ण टिमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे…

- Advertisement -

यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नाशिकच्या सोनु अहिरे (Sonu Ahire) यांची निवड झाली आहे तर सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी राकेश तिवारी यांची निवड झाली आहे. या फिल्म फेस्टीवलमध्ये वेगवेगळ्या देशातून व वेगवेगळ्या भाषेतील ८९२१ पेक्षा जास्त फिल्म्सने सहभाग नोंदवला आहे.

या सगळ्यांमध्ये ‘इनसाईड द शॅडो’ ही शॉर्ट फिल्म सर्वोत्कृष्ट ठरली आहे. या फिल्मचे दिग्दर्शक सोनु पवार यांनी या शॉर्ट फिल्मबाबत सांगितले की, लहान मुलांचे अपहरण हा अत्यंत ज्वलंत आहे, आणि यातून सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न या शॉर्ट फिल्म द्वारे करण्यात आला आहे. या फिल्ममध्ये रोचिता चव्हाण, भिकाजी पवार, वैभव पवार यांनी अभिनय केला असून दिलीप बालकर व मंगेश चव्हाण यांनी या शॉर्ट फिल्मची निर्माती केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या