धुळे – प्रतिनिधी dhule
नवीन वर्षाच्या (new year) पार्श्वभुमिवर शहर वाहतूक शाखेने अचानक तपासणी मोहीम राबवित मद्यपान करून वाहन चालविणार्या सहा दुचाकीस्वारांवर (bike rider) कारवाई केली. त्याचे वाहन जप्त करण्यात आले असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे (accident) प्रमाण कमी व्हावे, अंमली पदार्थांचे (दारुचे) सेवन करुन वाहन चालविणार्यांवर आळा बसावा तसेच नवीन वर्षाच्या स्वागतनिमित्त नागरिक मोठया प्रमाणात अंमली पदार्थाचे (दारुचे) सेवन करुन वाहन चालवित असतात. त्यात मोठया प्रमाणात अपघात होवून गंभीर दुखापती होवून नागरिकांचे जिवितांचे, मालमत्तेचे नुकसान होते. त्यामुळे याबाबत कारवाईचे आदेश प्राप्त झाले आहेत.
त्याअनुषंगाने अपघात होवु नये म्हणुन सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एस रुषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेने काल रात्री 8 ते 10.30 वाजेदरम्यान शहरात अचानक तपासणी मोहीम राबविली. या अंतर्गत दारूचे सेवन करुन वाहन चालविणार्या 6 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. त्यात मधुकर देवरे, महेंद्र भामरे, रविंद्र पाटील, कौतिक जाधव, श्रीरंग दिंडे, अभिजीत बोरनारे सर्व (रा.धुळे) यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे कारवाई करण्यात आली. या वाहन धारकांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. कारवाई ही पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धिरज महाजन तसेच शहर वाहतुक शाखेतील अंमलदार यांनी केली आहे. यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार आहे.