Monday, May 27, 2024
Homeनाशिकबोधीवृक्ष महोत्सव स्थळाची दादा भुसे अन् छगन भुजबळांकडून पाहणी

बोधीवृक्ष महोत्सव स्थळाची दादा भुसे अन् छगन भुजबळांकडून पाहणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात उद्या २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या ऐतिहासिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यक्रम स्थळी भेट देवून पाहणी केली.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून वीस हजार शिवसैनिक जाणार

बोधीवृक्ष रोपणाची जागा, बुद्ध स्मारक तसेच मुख्य कार्यक्रम हॉल व मंच या ठिकाणी भेट देवून उर्वरित अनुषंगिक बाबींची पूर्तता त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भंन्ते सुगत थेरो, माजी खासदार समीर भुजबळ, समिती सदस्य आनंद सोनवणे, माजी नगरसेवक बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Video : संजय राऊत मालेगाव कोर्टात गैरहजर; नेमकं कारण काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या