Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedसंगणकीय प्रणालीद्वारे हाेणार वाहनांची तपासणी

संगणकीय प्रणालीद्वारे हाेणार वाहनांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

परिवहन विभागाने राज्यात अत्याधुनिक आणि संगणकीय प्रणालीवर (Computer systems) आधारित यंत्रणेट्ठारे वाहनांचे तपासणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच आरटीओतील जागेत वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र स्थापन करून संपूर्ण संगणकीय चाचणी प्रणालीवर आधारित अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली. 

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगरसहित राज्यातील ४३ ठिकाणी अशा प्रकारची केंद्रे उभारली जाणार आहेत. परिवहन विभागाकडून वाहनांच्या फिटनेसची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येते. वाहनांचे फिटनेस संपल्यानंतर तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी प्रत्येक आरटीओमध्ये आता ४३ ठिकाणी ही केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात येणार्‍या अत्याधुनिक व संगणकीय केंद्रांसाठी २९ कोटी ३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या केंद्रांत संपूर्ण वाहनांची अत्याधुनिक पद्धतीने तपासणी होणार आहे. यापूर्वीच्या वाहन निरीक्षकांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. मात्र, आता यापुढे वाहन निरीक्षक वाहनाची तपासणी करणार नसून वाहनांची संपूर्ण तपासणी ही अत्याधुनिक आणि संगणकीय प्रणालीद्वारे केली जाईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या