कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
इंस्टाग्रामवर (Instagram) बहिणीला मेसेज करून शिवीगाळ (Abuse) केल्याचा राग मनात धरत तरुणाला पुण्यातून कोकमठाणाला आणत पाच जणांनी मारहाण (Beating) करत विषारी औषध पाजून खून (Murder) केल्याची घटना शनिवार 10 मे रोजी घडली असून पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत साईनाथ गोरक्षनाथ काकड व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात. ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते. मयत साईनाथ याने रुपाली लोंढे हिचे बहिणीला इस्टाग्रामवरुन (Instagram) मेसेज करुन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपी रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, पवन कैलास आसने, राहुल अशोक चांदर हे मयत साईनाथ काकड राहत असलेले ठिकाणी पुणे येथे गेले. त्याला घरातून ओढत आणून गाडीमध्ये टाकून कोकमठाण (Kokamthan) येथे घेवून आले.
कोकमठाण येथे त्याला मारहाण (Beating) करत त्याला काहीतरी विषारी औषध पाजुन त्याचा खुन केल्याची घटना घडली. फिर्यादी महेश गोरक्षनाथ काकड याने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. व. कलम 251/2025 कलम 103 (1), 140 (1), 189 (2), 191 (2) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पो. नि. भगवान मथुरे, सपोनि किशोर पवार, पोसई दिपक रोठे, पोसई भुषण हंडोरे आदींनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे.