Thursday, November 12, 2026
Homeक्राईमCrime News : इन्स्टाग्रामवर एआय फोटोंच्या माध्यमातून बदनामी

Crime News : इन्स्टाग्रामवर एआय फोटोंच्या माध्यमातून बदनामी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोशल मीडियाचा गैरवापर करून एका व्यावसायिकाची आणि एका महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. एका तरुणाने एआयचा वापर करून आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रसारित करून समाजात बदनामी केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित खातेधारकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील एका मोबाईल दुकानदाराने या संदर्भात सोमवारी (27 एप्रिल) फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, एका संशयित इन्स्टाग्राम खातेधारकाने फिर्यादीच्या पत्नीबद्दल अत्यंत अश्लील मजकूर स्टोरीमध्ये लिहिला होता. इतकेच नव्हे तर, फिर्यादी आणि गावातील एका महिलेचे छायाचित्र घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने (एआय) आक्षेपार्ह फोटो तयार करण्यात आले. हे बनावट फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक करून दोघांचीही बदनामी केली. हा प्रकार मार्च महिन्यापासून सुरू होता.

वारंवार होणार्‍या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित व्यक्तीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा तांत्रिक शोध घेतला जात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...