Saturday, May 4, 2024
Homeनगरइंस्टाग्रामवरील बनावट अकाऊंटवरून युवतीला पाठविले अश्‍लिल फोटो, व्हिडीओ

इंस्टाग्रामवरील बनावट अकाऊंटवरून युवतीला पाठविले अश्‍लिल फोटो, व्हिडीओ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

इंस्टाग्रामवर युवतीच्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करून त्याव्दारे युवतीला अश्‍लिल फोटो व व्हिडीओ पाठवून बदनामी केल्याची घटना 15 ऑक्टोबर रोजी घडली आहे. या प्रकरणी 17 ऑक्टोबर रोजी कर्जत तालुक्यातील पीडित युवतीने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून बनावट अकाऊंट तयार करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 354 (अ), (ड), 506 सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 67, 67 (ए) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील फिर्यादी युवतीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान या बनावट अकाऊंटवरून फिर्यादी युवतीला अश्‍लिल मेसेज व अश्‍लिल व्हिडिओ पाठविले. सदरचे व्हिडीओ व फोटो पाहिल्याने युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. सदरचा प्रकार युवतीच्या लक्ष्यात आल्याने तिने सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या