Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमइंस्टाग्रामवर चॅटिंग; विद्यार्थिनीला शाळेतून पळवून नेण्याचा प्रयत्न

इंस्टाग्रामवर चॅटिंग; विद्यार्थिनीला शाळेतून पळवून नेण्याचा प्रयत्न

माळवाडगावातील घटना || मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav

एकमेकांच्या नाव गावाचा परिचय नसताना दोघांची शेयर चॅटवर दोन दिवसांत ओळख झाली. पुढील दोन दिवस इंस्टाग्रामवर चॅटींग होऊन पाचव्या दिवशी दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीने म़ोबाईलवर विद्यालयाचे लोकेशन टाकले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 80 कि.मी.अंतराहून हिरो चक्क विद्यालयात हजर होऊन, धूमस्टाईलने विद्यार्थिनीला पळवून घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच, मुख्याध्यापक व स्टाफच्या सतर्कतेने हिरो व सदर विद्यार्थिनी जाळ्यात अडकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे सदर घटना घडल्याने शिक्षक व पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, माध्यमिक विद्यालय आहे. काल सकाळी सर्व वर्गाचे क्लास सुरू असताना, समोरच्या मोटारसायकल स्टँडवर ऐटीत मोटारसायकल लावून अंगात पांढरा टी-शर्ट, पाठीवर बॅग लटकवलेल्या तरुणाने विद्यालयाच्या व्हरांड्यात प्रवेश केला. मुख्याध्यापक जी.बी.नाईक बाहेरच उभे होते. येणार्‍या व्यक्तीकडे पाहत असतानाच समोरच्याने दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचे नाव सांगून, मी तिच्या आत्याचा मुलगा आहे. तिला घेण्यासाठी आलो आहे. तिला तिच्या घरी भामाठाण येथे घेऊन जायचे आहे. विद्यार्थीनीस निरोप दिल्याने तिही पाठीवर बॅग लटकवून वर्गाबाहेर आली. एकमेकांना पाहिलेले नसताना, लगबगीने तो तरुण त्या विद्यार्थिनीजवळ गेला.

तिच्याशी कुजबूज करू लागला. तेवढ्यात शिक्षक मुकुंद कालांगडे व एस. बी. उंडे वर्गाबाहेर मुख्याध्यापक श्री. नाईक यांच्या सोबतीला आले. श्री.उंडे यांना संशय आल्याने त्या विद्यार्थीनीच्या घरी भामाठाण येथे मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी सांगितले आम्ही कुणा भाच्याला पाठवले नाही, अन् आम्हाला भाचाही नाही. शिक्षक स्टाफच्या हा प्रकार लक्षात आला. तेवढ्यात तो तरुण विद्यार्थीनीसह मोटारसायकलकडे धाव घेण्याच्या तयारीत असतानाच सेवक टी. ई. चौधरी यांनी त्याची कॉलर पकडली. अन्य शिक्षकांच्या मदतीने त्यास ओढत कार्यालयात आणले. अवघ्या वीस मिनिटात विद्यालयात विद्यार्थीनीचे नातेवाईक हजर झाले.

आजुबाजूला गजबजलेल्या परिसरात ही वार्ता समजताच शेकडो तरूणांची विद्यालयासमोर गर्दी झाली. भामाठाण येथील तरूणांचीही गर्दीत भर पडली. गावातील शालेय शिक्षण समिती पदाधिकारी,उपसरपंच, पत्रकार आल्यानंतर सदर तरुणास बंद खोलीत घेऊन संरक्षण देण्यात आले. कारण बाहेर तरूण आरडाओरड करून त्यास आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होते. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला घटनेची खबर देण्यात आली.

संतप्त जमावाच्या तीव्र भावना पाहून विद्यार्थीनी व तिचे आईवडील तसेच बाहेरून आलेला तो तरुण यांना गाडीत बसवून श्रीरामपूरला पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समोर हजर करण्यात आले. दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. त्या तरूणाने त्याचे नाव दिपक (रा. वसू सायगाव परिसर, ता.गंगापूर) असे सांगितले. हा विद्यार्थी देवगाव रंगारी येथील सिनियर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. मुलगी दहावीत शिकत असून अल्पवयीन आहे. भामाठाण येथील विद्यार्थीनीचे आई वडील नातेवाईक भामाठाण येथील प्रतिष्ठित, अन् वसू सायगांव येथील त्या विद्यार्थ्यांचे वडील व नातेवाईक यांच्या विनंतीवरून मुलीचे पुढील भवितव्य पाहून पुढील कारवाई करण्यात आली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...