Sunday, October 4, 2026
Homeक्राईमCrime News : इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून विवाहितेला त्रास

Crime News : इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून विवाहितेला त्रास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका विवाहित महिलेला वारंवार अश्लील मेसेज पाठवत मानसिक छळ केल्याप्रकरणी संबंधित मोबाईलधारकाविरोधात अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाथर्डी तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या पीडित 24 वर्षीय महिलेने मंगळवारी (21 जुलै) फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सध्या आपल्या माहेरी वास्तव्यास आहेत. फिर्यादी इन्स्टाग्राम अकाउंट वापरत आहेत. त्यांना एका बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रथम दोन मेसेज आले. सुरूवातीला त्यांनी समोरची व्यक्ती कोण आहे, याची विचारणा केली.

- Advertisement -

मात्र संबंधित व्यक्तीने आपली ओळख सांगण्यास टाळाटाळ करत भेटण्याची मागणी केली. त्यानंतर त्या व्यक्तीने अत्यंत अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवून लैंगिक स्वरूपाच्या मागण्या केल्या तसेच खासगी छायाचित्रांची मागणी करत सातत्याने ऑनलाइन छळ सुरू ठेवला. या प्रकारामुळे फिर्यादी यांना मानसिक त्रास, लाज व किळस वाटू लागल्याने त्यांनी संबंधित इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले.

मात्र पतीच्या सल्ल्यानुसार संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पुन्हा संवाद साधला असता अश्लील मेसेजचा प्रकार सुरूच राहिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारीच्या चौकशीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान नात्यातील व्यक्तीने हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...