मुंबई | Mumbai
शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. सिनेमाच्या ट्रेलरने सर्वांनी उत्सुकता वाढवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शाहीरमधील गाण्यांनीदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ (Baharla ha Madhumas nava) हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स बनवत आहेत.
सना शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्यावर हे गाणं चित्रत करण्यात आलं आहे. गाण्यात आली उमलून माझ्या गाली या ओळींवर सनाने सुंदर हुक स्टेप केली आहे. ही हुक स्टेप व्हायरल झाली असून तांजानियाच्या किली पॉल (Kili Paul & Nima) आणि त्याची बहीण नीमादेखील गाण्याची भुरळ पडली आहे. किली पॉल आणि त्याच्या बहिणीने बहरला हा मधुमास या गाण्यावर रील तयार केली आहे. दोघेही त्यावर नाचताना दिसत आहे. किलीची बहिण नीमा हिने मधुमासची हुक स्टेप फार सुंदररित्या केली आहे.
वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का..! नागपुरात फडणवीसांपाठोपाठ अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर
भाषा येत नसली तरी म्युझिक आणि हावभाव समजून त्यावर रील्स करणं, लिप्सिंग करणं यासाठी किली आणि नीमा पॉल यांचं नेहमीच कौतुक करण्यात आलं आहे. त्यांची ती खासियत आहे. यावेळी तर शाहीरांच्या सिनेमातील शाहीरी बाजातील या गाण्याचीदेखील त्यांना भुरळ पडली. दोघांनी बहरला हा मधुमासचं लिप्सिंगही केलं आहे. बहरला हा मधुमासवर आजवर तयार करण्यात आलेल्या बेस्ट रील्स व्हिडीओमधील हा एक रील असल्याचं म्हटलं जात आहे.
स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर…; बारसू रिफायनरीवर पवारांचा सामंतांना सल्ला
किली आणि नीमा यांच्या या व्हिडीओला एका एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘भाऊ मराठी प्रेक्षकांना खुश केल्याबद्दल तुला, प्रेमाचा जय महाराष्ट्र!’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘मस्त डान्स केला नीमा ताई आणि किली भाऊ’. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात अंकुश चौथरीसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकारही प्रमुख भूमिका साकारणार आहेत.