Saturday, May 4, 2024
Homeनाशिकविद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी रूजवा

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी रूजवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनामुळे (corona) विद्यार्थ्यांना (students) ऑनलाइन (online) पद्धतीने शिक्षण (education) दिले गेले. ऑनलाइन शिक्षणामुळे (online education) गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे आता शिक्षकांना (teachers) गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

- Advertisement -

नवीन शिक्षण धोरणात (new education policy) शिक्षक केंद्रस्थानी आहे. या धोरणामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. शिक्षणातून भाषा आणि साहित्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (Maharashtra Sahitya Parishad) कार्यवाह मिलिंद जोशी यांनी केले.

प. सा. नाट्यगृह येथे सार्वजनिक वाचनालय नाशिक (Public Library Nashik) आणि शिक्षक गौरव समितीतर्फे (shikshak gaurav samiti) गेल्या 51 वर्षांपासून देण्यात येणार्‍या शिक्षक पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंतराव पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर,

प. सा. नाट्यगृह येथे सार्वजनिक वाचनालय नाशिक (Public Library Nashik) आणि शिक्षक गौरव समितीतर्फे (shikshak gaurav samiti) गेल्या 51 वर्षांपासून देण्यात येणार्‍या शिक्षक पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंतराव पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर,

उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, प्रा. शंकर बोर्‍हाडे आदी उपस्थित होते. मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता कवीश्वर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सविता कुशारे यांनी तर करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. डॉ. यशवंतराव पाटील यांनी नागरिक शिक्षक गौरव समितीच्या वतीने स्वागत केले.

यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, अर्थसचिव उदयकुमार मुंगी, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, बालभवन प्रमुख गिरीश नातू, बी.जी. वाघ, श्रीकांत बेणी, अ‍ॅड. भानुदास शौचे, वसंत खैरनार, प्राचार्य डॉ. संगीता बाफना तसेच अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त शिक्षक

प्राथमिक विभागातील शिक्षक- छाया माळी, अनंत तुळशीराम शिंदे, वासुदेव पुंडलिक बधान, मोहन बाजीराव माळी.. माध्यमिक विभागातील शिक्षक-रोहित रामदास गांगुर्डे, राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी, मुग्धा राजेंद्र जोशी, जुईली चारुदत्त शेरीकर. उच्च माध्यमिक- डॉ. संजय खंडेराव शिंदे, प्रा. डॉ. विक्रम रघुनाथ काकुळते, डॉ. कविता संजय पाटील, प्रा. डॉ. निवृत्ती तुपे. संत साहित्य अभ्यासक- डॉ. उल्हास रत्नपारखी- क्रीडा शिक्षक- योगेंद्र शिवाजीराव पाटील, सोमेश्वर रघुनाथ मुळाणे. विशेष चित्रकला- मनीष जोगळेकर, शास्त्रीय संगीत- आशिष विजय रानडे, मुख्याध्यापक- अनिल बाळकृष्ण नागरे, विशेष कार्य पुरस्कार- उत्तम श्रावण तांबे, व्यावसायिक- अनिल रामदास भंडारे, संशोधक अध्यापक- डॉ. किरण रकिबे, व्यावसायिक शाखा- डॉ. सुनील कुटे

- Advertisment -

ताज्या बातम्या