Tuesday, November 26, 2024
HomeमनोरंजनBig Boss कार्यक्रमात मराठीचा अपमान; कलर्स टीव्हीकडून माफीनामा

Big Boss कार्यक्रमात मराठीचा अपमान; कलर्स टीव्हीकडून माफीनामा

मुंबई | Mumbai

कलर्स टीव्हीवरील Bigg Bos 14 या कार्यक्रमातील स्पर्धक जान कुमार सानू यांने मराठी भाषेचा अवमान करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त मनसे, शिवसेना यांच्यासह सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. या निर्माण झालेल्या वादानंतर कलर्स टीव्ही या वाहीनीने पत्र लिहून माफी मागितली आहे. कलर्सने माफी मागणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे.

- Advertisement -

कलर्स टीव्हीने मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, “२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषणांचा आम्ही सन्मान करतो.”

काय आहे प्रकरण ?

Bigg Boss 14 दरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू – अमेय खोपकर

जान कुमार सानूच्या या वक्तव्याचा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘जान कुमार सानू.मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी.मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं’, असं ट्विट करत अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला – आमदार प्रताप सरनाईक

Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या