Saturday, March 29, 2025
Homeनगरविमा कंपनीचे राज्य पातळीवरील अपिल कृषी आयुक्तांनी फेटाळले

विमा कंपनीचे राज्य पातळीवरील अपिल कृषी आयुक्तांनी फेटाळले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अपुर्‍या पावसामुळे यंदा जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पन्नात 50 ते 95 टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. यामुळे पिक विमा कंपनीने नुकसानीपोटी शेतकर्‍यांना 25 टक्के रक्कम अग्रीम देण्याची अधिसुचना जिल्हाधिकारी यांनी 3 ऑक्टोबरला काढली होती. यातील 9 लाख 7 हजार 275 शेतकर्‍यांपैकी 2 लाख 31 हजार शेतकर्‍यांना 160 कोटी 28 लाख रुपयांचे अग्रीम विमा कंपन्यानी मंजूर केले आहेत. उर्वरित 6 लाख 76 शेतकर्‍यांचे अग्रीम देण्याऐवजी संबंधीत विमा कंपनीने कृषी आयुक्त यांच्याकडे अपिल केले होते. हे अपिल कृषी आयुक्तांनी फेटाळे असून यामुळे जिल्ह्यातील उर्वरित अग्रीमसाठी पात्र शेतकर्‍यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.

- Advertisement -

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448.1 मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, केवळ 73 टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यांतही 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील बहुतांशी पिकांची अवस्था दयनीय झाली. पाणी नसल्याने पिके सकली. त्यामुळे कृषी विभागाने खरीपाच्या उत्पादनात 50 ते 95 टक्क्यांपेक्षा जास्त घटीची शक्यता वर्तवली. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिसुचना काढत पात्र शेतकर्‍यांना नुकसानीपोटी 25 टक्के अग्रीम देण्याचे आदेश दिले. कृषी विभागाने जिल्ह्यात पाच टक्के सर्वेक्षण करून पिकांचे होणारे नुकसान निश्चित केले होते. त्यानूसार जिल्ह्यात 9 लाख 7 हजार 275 शेतकरी अग्रीमसाठी पात्र ठरवण्यात आले.

मात्र, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अग्रीमच्या आदेशाला संबंधीत विमा कंपनीने आधी जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर त्यानंतर विभागीय महसूल आयुक्त आणि आता कृषी आयुक्त पातळीवर अपिल केले होते. कृषी आयुक्तांनी हे अपिल फेटाळले आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या 9 लाख 7 हजारपैकी 6 लाख 76 शेतकर्‍यांचे अग्रीमचा मार्ग मोकळला झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली. यामुळे जिल्ह्यात अग्रीम मिळणे बाकी असणार्‍या शेतकर्‍यांना लवकरच अग्रीमची रक्कम मिळणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील 97 महसूल मंडलापैकी 74 मंडलामधील 5 लाख 29 हजार 213 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यांना अग्रीम देण्यात येणार आहे. यात उडीद, मूग, भुईमुग, मका, बाजरी, कापूस, कांदा, तूर, सोयाबीन, भात या पिकांचे नुकसान झालेले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....