Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूज६४ लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींची विमा भरपाई; कृषी मंत्री माणिकराव कोकाटे...

६४ लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींची विमा भरपाई; कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २ हजार ५५५ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ हजार ८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी दिली.

या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कोकाटे यांनी म्हणाले.

- Advertisement -

विमा नुकसान भरपाईच्या अंतर्गत खरीप आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी १८१ कोटी, रब्बी हंगाम २०२३-२४ साठी ६३.१४ कोटी आणि खरीप हंगाम २०२४ साठी २ हजार ३०८ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण २ हजार ५५५ कोटी रुपयांचा लाभ ४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही कोकाटे यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोठी बातमी! त्र्यंबकला बंदिस्त गोदावरी मुक्त श्वास घेणार, नदीवरील स्लॅब काढणार;...

0
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधीअनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वरला कुशावर्त ते गायत्रीमंदिर पर्यंत सिमेंट काँक्रिट स्लॅबखाली बंदिस्त असलेली गोदावरी नदी येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोकळा श्वास घेणार आहे. कारण...