Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमCrime News : मतिमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला जन्मठेप

Crime News : मतिमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला जन्मठेप

डीएनए अहवालाच्या आधारे गुन्हा सिध्द || पाथर्डी तालुक्यातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मतिमंद, मूकबधिर व कर्णबधिर मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी दोषी ठरवत त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. साहेबराव लक्ष्मण शिंदे (वय 76, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. जी. के. मुसळे यांनी काम पाहिले.
या घटनेतील पीडिता ही मतिमंद, भोळसर, मूकबधिर व कर्णबधिर असल्याने स्वतःची बाजू मांडण्यास असमर्थ होती. 2 मार्च 2022 पूर्वी सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत आरोपीने पीडितेच्या अपंगत्वाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

- Advertisement -

घटनेच्या काळात पीडितेची आई, वडील आणि भाऊ उपचारासाठी नगर येथे गेले होते. घरात पीडिता एकटी असल्याची संधी साधून आरोपीने शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेच्या आईने 2 मार्च 2022 रोजी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी केला. गुन्ह्यातील आरोपी शोधण्यासाठी तपास पथकाने तब्बल 15 संशयित व्यक्तींचे रक्त व इतर जैविक नमुने घेतले. रासायनिक विश्लेषण प्रयोगशाळेकडे नमुने पाठविण्यात आल्यानंतर पीडितेच्या अर्भकाचा डीएनए आणि आरोपी साहेबराव शिंदे याचे नमुने एकमेकांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. डीएनए अहवालासह इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीविरूध्दचा गुन्हा सिध्द झाल्याने त्याला 24 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली.

खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण 15 साक्षीदार तपासले. यामध्ये पीडितेची आई, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी पाटील यांची साक्ष तसेच डीएनए आणि रासायनिक विश्लेषण प्रयोगशाळेचा अहवाल हा महत्त्वाचा पुरावा ठरला. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कठोर शिक्षा ठोठावली. न्यायालयाने दंडाच्या रकमेपैकी 10 हजार रूपये पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मुसळे यांना तपासी अधिकारी पाटील, सहाय्यक फौजदार डी. जी. बेरड, पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार आर. डी. आडसुळ आणि महिला पोलीस अंमलदार राणी बोरडे यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

Crime News : डीजे वाजवल्यास मंडळासह चालकावरही गुन्हा; नगर तालुका पोलिसांचा...

0
नगर । तालुका प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे...