Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहिला आमदारांच्या आज लक्षवेधी सूचना

महिला आमदारांच्या आज लक्षवेधी सूचना

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज, बुधवारी विधानसभा कामकाजात महिला लोकप्रतिनिधींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार आजच्या कामकाज पत्रिकेत सर्वपक्षीय महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

तारांकित प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे सभागृहात ठेवली जातात. त्यानंतर लक्षवेधी सूचनांवर चर्चा होते. आज ८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय आठ महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला येणार आहेत. त्यात भाजपच्या देवयानी फरांदे, डॉ. भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले, शिवसेनेच्या यामिनी जाधव, काँग्रेसच्या जयश्री जाधव, यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे या महिला आमदारांचा समावेश आहे.

आधुनिक महिला धोरणासाठी ठराव

दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आधुनिक महिला धोरण तयार करण्याच्या संदर्भात ठराव मांडणार आहेत. राज्य सरकारचे १९९४, २००२, २०१४, २०१९ चे प्रस्तावित धोरण तसेच २००१ चे राष्ट्रीय महिला धोरण यांचे एकत्रिकरण करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण तयार करण्याबाबत सरकारने उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचा हा ठराव आहे.

आज आर्थिक पाहणी अहवाल

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे चित्र स्पष्ट करणारा सन २०२२-२३ या वर्षाचा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आज, बुधवारी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करतील. कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने नजीकच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालाची सर्वांना उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या