Wednesday, November 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबईत हलवणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्र...

एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबईत हलवणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र

मुंबई | Mumbai

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एकही विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवले जाणार नाही, अशी ठाम आणि स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुंबई विमानतळाचे संचालन करणार्‍या ‘एमआयएएल’ या कंपनीने पुढील उन्हाळ्याच्या वेळापत्रकापासून बहरीन, दोहा, जकारता, जेद्दाह, कुवेत, मस्कत, रियाध आणि शारजा यांसारख्या 14 प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची योजना आखली होती.

- Advertisement -

मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत स्थलांतरित करण्याची कोणतीही योजना नसून, दोन्ही विमानतळ स्वतंत्रपणे आणि आपापल्या क्षमतेनुसार पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना थेट पत्र लिहून आपला तीव्र आक्षेप नोंदवला असून टर्मिनल-1 च्या पुनर्विकासासाठी एक पर्यायी प्रस्तावही सादर केला आहे.

टर्मिनल-1 च्या पुनर्विकास कामांमुळे उन्हाळ्यातील स्लॉट्स सामावून घेणे कठीण होईल, तसेच टर्मिनल-2 मधील आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये सुमारे एक तृतीयांश कपात करावी लागेल, असा युक्तिवाद कंपनीने केला होता. यामुळे दरवर्षी सुमारे 50 लाख देशांतर्गत प्रवाशांच्या क्षमतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

ताज्या बातम्या