13 ऑगस्ट म्हणजे उजव्या हाताच्या जगात राहणार्या डावखुर्या लोकांनी अनुभवलेल्या समस्यांबद्दल जागरूकता पसरवण्याचा आजचा दिवस आहे. जगभरात अनेक सेलिब्रिटीज, प्रसिद्ध व्यक्ती, नेते यांसह अनेक लोक हे डावखुरे आहेत. आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँड डे हा या लोकांचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी साजरा केला जातो.
13 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस म्हणून साजरा केला जातो. डाव्या हाताने काम करणार्या लोकांच्या समस्या सर्वांपर्यंत पोचवल्या जाव्यात, त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डावखुरेपणा ही व्याधी नाही असे असणं, पूर्णतः नॉर्मल आहे हे सत्य समाजापर्यंत पोचवलं जावं, जेणेकरून एखाद्या मुलाचे दडपणामुळे भावविश्व कोमेजले जाऊ नये, हा महत्त्वाचा उद्देश त्यामागे आहे. हे जग फक्त उजव्यांचच नाही तर डावखुर्यांचही आहे. काही लोक डावखुरे का असतात याचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही, परंतु असे म्हटले जाते की जगातील सुमारे 13 टक्के लोकसंख्या डावखुरी आहे आणि असे मानले जाते की ते अनुवांशिक आहे. अलीकडे काही संशोधकांनी एक जीन ओळखला आहे. त्यांना वाटते की, हे जीन असेल तर डावखुरे बाळ जन्माला येऊ शकते. म्हणून, एखाद्या व्यक्तीमध्ये हा जीन असल्यास, त्याची मुले डावखुरी असू शकतात.
डाव्या हाताच्या वापरामुळे डावखुर्या लोकांना निकृष्ट मानले जात होते आणि हे जादूटोण्याशी संबंधित असते असेही बोलले जात होते. अमेरिकेच्या अखेरच्या आठ राष्ट्राध्यक्षांपैकी पाच डाव्या हाताने लिहितात. त्यात रोनाल्ड रेगन, जेराल्ड फोर्ड, जॉर्ज बुश, बिल क्लिटंन आणि बराक ओबामा यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे 13 ऑगस्ट 1992 रोजी लेफ्ट हॅन्डर्स क्लबने वार्षिक कार्यक्रम म्हणून सुरू केला. लेफ्टींच्या अद्वितीय गुणांचा उत्सव साजरा करणे आणि डावखुरे असण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा त्याचा उद्देश. सदस्यांच्या संपर्कात राहण्यासाठी 1990 मध्ये लेफ्ट हॅन्डर्स क्लबची स्थापना करण्यात आली.
संशोधक सांगतात की, व्यक्ती जेनेटिक्स किंवा आसपासच्या वातावरणामुळे लेफ्टी असतात. काही अभ्यास आणि संशोधनांमध्ये इतरही काही फॅक्ट समोर आले आहेत. त्या फॅक्टवरून आम्ही तुम्हाला लेफ्ट हँडर्सबाबत काही खास माहिती सांगणार आहोत.
* जास्त क्रिएटिव्ह असतात – असे समजले जाते की, लेफ्टी लोक जास्त क्रिएटिव्ह असतात. पण संशोधनानुासर क्रिएटिव्हिटीचा लेफ्ट किंवा राइट हँडर असण्याशी संबंध नाही.
* जेनेटिक असते – शास्त्रज्ञांना अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, काही लोक लेफ्टी का असतात. पण एका फॅक्टनुसार चारपैकी एका प्रकरणात हे जिन्समुळे म्हणजे अनुवांशिक असते.
* डावखुरे लोक मेंदुचा उजवा भाग वापरतात – न्यूझीलंडच्या व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार फक्त 30 टक्के लेफ्ट हँडर्स लँग्वेज प्रोसेससाठी मेंदूच्या उजव्या पार्टचा वापर करतात. 70 टक्के लेफ्टी लेफ्ट पार्टचा वापर करतात.
* लेफ्टी असल्याचा अभ्यासावर परिणाम होतो – ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार लेफ्ट हँडर मुले शाळेत राइट हँडर्सच्या तुलनेत रीडींग, रायटिंग, सोशल डेव्हलपमेंट सारख्या गोष्टींत मागे राहतात.
* लेफ्टी खेळात पुढे असतात – टेनिस, क्रिकेट, बॉक्सिंग, बेसबॉल अशा अनेक खेळांत लेफ्टी चांगली कामगिरी करतात. टॉप टेनिस प्लेयर्समध्ये 40 टक्के जास्त लेफ्टी आहेत.
* प्रेग्नेंसीशी याचा संबंध आहे – एक ब्रिटिश स्टडीनुसार प्रेग्नंसीदरम्यान स्ट्रेसमुळे मुले लेफ्टी असल्याची शक्यता अधिक असते. कमी वजनाची किंवा जास्त काळची प्रेग्नंसी असेल तरी मूल लेफ्टी होऊ शकते.
* जुळ्यांमध्ये जास्त प्रमाण – बेल्जियमच्या एका संशोधनानुसार सामान्य लोकांच्या तुलनेत लेफ्ट हँडर्सचे प्रमाण जुळ्यांमध्ये अधिक असते.