Friday, February 6, 2026
Homeदेश विदेशAccident News : अमेरिकेत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले;...

Accident News : अमेरिकेत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली | New Delhi

नववर्षाचे जगभरात जल्लोषात स्वागत होत असताना अमेरिकेतील (America) न्यू ऑरलियन्स येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना (People) भरधाव ट्रकने चिरडले आहे. तसेच या घटनेनंतर हल्लेखोरांने ट्रकमधून उतरून बेछूट गोळीबार (Firing) केला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ३.१५ च्या सुमारास नाइल लाईफ आणि व्हायब्रंट कल्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरबन स्ट्रीट आणि इबविर्ले चौकात घडली. हा हल्ला (Attack) दहशतवादी हल्ला होता की आणखी काही याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. तसेच घटनेनंतर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

YouTube video player

दरम्यान, अपघात (Accident) आणि गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून घटनास्थळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओ आणि फोटो या भागात पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि कोरोनर ऑफिसची वाहने दाखवतात, जिथे स्थानिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि संशयिताला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...