Tuesday, September 24, 2024
Homeक्रीडाऑलिम्पिकपटू दीपा कर्माकर अडचणीत, ITA ने घातली २१ महिन्यांची बंदी... काय आहे...

ऑलिम्पिकपटू दीपा कर्माकर अडचणीत, ITA ने घातली २१ महिन्यांची बंदी… काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये आपल्या खेळाने भारतीय जिम्नॅस्टिकला ओळख देणारी महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) दीपावर २१ महिन्यांसाठी बंदी घातली आहे.

दीपा कर्माकरवर आयटीएने हायजेनामाइन (Higenamine) प्रतिबंधित पदार्थाची चाचणी (dope test) पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला अपात्र ठरवत २१ महिन्यांची बंदी घातली आहे. दीपाच्या चाचणीचे नमुने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी स्पर्धेबाहेर काढण्यात आले आणि ही बंदी १० जुलै २०२३ पर्यंत कायम राहील.

अबुधाबीहून केरळला येणाऱ्या Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग अन्…

दीपाच्या चाचणीत कोणते औषध सापडले?

दीपा कर्माकर हिजेमिन एस-3 बीटा-2 घेतल्याबद्दल दोषी आढळली आहे. इंटरनॅशनल डोपिंग एजन्सीने Hygemin S-3 Beta-2 ला प्रतिबंधित औषधांच्या श्रेणीत ठेवले आहे. या औषधांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळलेल्या कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते.

राणेंच्या अडचणी वाढणार? राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

हायजेनामाइन म्हणजे काय?

युनायटेड स्टेट्स अँटी-डोपिंग एजन्सी (यूएसएडीए) नुसार, हायजेनामाइनमध्ये मिश्रित अॅड्रेनर्जिक रिसेप्टर आहे. ते सामान्य उत्तेजक म्हणून काम करू शकते. 2017 मध्ये WADA च्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. हायजेनामाइन वापर कमी प्रमाणात दम लागण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा वापर कार्डियक आउटपुट वाढवण्यासाठी हृदयाची स्थिती मजबूत करण्यासाठी केला जाऊ जातो.

“उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, पण…”; शिंदे गटाच्या बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

कोण आहेत दीपा कर्माकर?

त्रिपुराची दीपा कर्माकर ही भारतातील टॉप जिम्नॅस्टपैकी एक आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली होती. यानंतर, २०१८ मध्ये, तिने तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली. दीपा कर्माकरला गोल्डन गर्ल म्हणूनही ओळखले जाते.

शेती महामंडळाचा कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात

- Advertisment -

ताज्या बातम्या