Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकInternational Women's Day 2025 : गृहउद्योजिकांची यशस्वी गाथा

International Women’s Day 2025 : गृहउद्योजिकांची यशस्वी गाथा

शुन्यातून व्यवसाय वृद्धी करत महिलांची वाटचाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जागतिक महिला दिननिमित्त (International Women’s Day) ‘देशदूत’ विशेष संवाद कट्ट्यामध्ये घरगुती व्यावसायिक महिलांशी (Women) संवाद साधला गेला. या महिलांनी आपल्या घरातून शुन्यातून व्यवसायाला सुरुवात केली आणि व्यावसायिक म्हणून आपले विश्व निर्माण केले. स्वतःमधून काही ऊर्जा मिळवत त्याचे रूपांतर त्यांनी सुरू केलेल्या त्यांच्या घरगुती व्यवसायात झाले आहे. या संवाद कट्ट्यामध्ये महिला रिक्षाचालक मिनल विश्वंभर, शिवणकाम करून बचतगट चालवणाऱ्या संजीवनी देवगिरे, रुही फूडस या नावाने घरगुती मसाले, वाळवण व लोणच्याचा व्यवसाय करणाऱ्या वर्षा कुलकर्णी व आस्वाद केटरर्स नावाने रुग्ण व वयस्क मंडळींसाठी पथ्याचे डब्बे तसेच कार्यक्रमाचे जेवण तयार करून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या दुर्गा बापट यांच्याशी ‘देशदूत’ च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी कार्यक्रमात सहभागी महिलांनी आपले बरे-वाईट अनुभव सांगितले. या महिलांनी अगदी लहान गोष्टींपासून व्यवसायाला (Business) सुरुवात केली. आज त्याच व्यवसायामुळे कौटुंबिक जबाबदारी त्या चांगल्या पद्धतीने पार पाडत असल्याचे दिसून आले.घरगुती शिवणकाम, बचतगट, गृहउद्योग ते रिक्षाचालक अशा विविध क्षेत्रात महिलांनी आपला नावलौकिक केल्याचे महिलांच्या बोलण्यातून जाणवले. करोनाच्या (Corona) संकटाला घाबरून न जाता त्याकडे सकारात्मक दृष्ट्या बघून त्यातूनही व्यवसायाची संधी कशी निर्माण करता येईल, असे महिलांनी दाखवून दिले. रिक्षा चालवत असताना मिनल विश्वंभर यांनी आपले सामाजिक भान लक्षात घेत महिला, तरुणींना आपल्या सहवासात सुरक्षिततेची भावना कशी निर्माण होईल, याकडे लक्ष दिले.

व्यवसाय करताना आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांची सेवा कशी करता येईल, हे दुर्गा बापट यांनी त्यांच्या केटरिंग व्यवसायातून साधले. अनेक संकटांना सामोरे जाऊन प्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन आपल्या संसाराचा गाडा हाकण्याकरता व मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडवताना वर्षा कुलकर्णी यांनी चिकाटीने व आत्मविश्वासाने व्यवसाय चालू ठेवला. चांगल्या प्रतीच्या गुणवत्तेने घरातून सुरू केलेला व्यवसाय विदेशात पोहोचवला. घरातून शिवणकामाची सुरुवात करून महिलाचा बचत गट स्थापून त्यांचे कौशल्य विकास घडवत महिला सबलीकरणासाठी (Empowerment) नेतृत्व दाखवून संजीवनी देवगिरे यांनी महिला सबलीकरणाचे उदाहरण दाखवून दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...