Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याआंतरराष्ट्रीय युवादिन विशेष : तरुणांना राजकारणातील संधी दूर

आंतरराष्ट्रीय युवादिन विशेष : तरुणांना राजकारणातील संधी दूर

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

राजकारणात तरुणांना धोरण विकास/बदलामध्ये बोलण्याची अधिक संधी दिली तर राजकीय व्यवस्था अधिक चांगली होऊ शकेल, असे तज्ज्ञ नेहमी म्हणतात. मात्र त्यांना फारशी संधी मिळत नाही. जागतिक स्तरावर केवळ 2.6 टक्के संसद सदस्य 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या तरुण संंसद सदस्यांपैकी एक टक्क्यापेक्षा कमी महिला आहेत. हे प्रमाण जेव्हा वाढेल तेव्हा तरुणांचा आवाज बुलंद होईल व त्यांचे प्रश्नही सुटण्यास मदत होईल.

- Advertisement -

शनिवारी (दि.12) 23 वा ‘आंतरराष्ट्रीय युवादिन’ साजरा होत आहे. दरवर्षी यानिमित्त युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूंवर चर्चा घडवली जाते. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून सर्व वयोगटांसाठी ‘एक जग तयार करणे’ या थीमसह हा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्त तरुणांना राजकारणात मिळणार्‍या संधीचा आढावा घेत असताना वरील चित्र समोर आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स इत्यादी 15 क्षेत्रांची निवड प्राधान्याने केली. युवकांना मिळणार्‍या संधींची संख्या वाढवणे, त्यांची गुणवत्ता वाढवणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढवणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

लिस्बन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवादिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस युवादिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.

युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरुक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकूल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पुढील 15 वर्षांत 600 दशलक्ष नोकर्‍यांची गरज

आज रोजगार, शिक्षण किंवा प्रशिक्षणात नसलेल्या तरुण लोकांचे प्रमाण गेल्या 15 वर्षांत वाढताना दिसत आहे. त्यात स्त्रिया 30 टक्के आणि तरुण पुरुष 13 टक्के आहेत. तरुणांच्या रोजगाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील 15 वर्षांत 600 दशलक्ष नोकर्‍या निर्माण झाल्या तर त्यांचे भवितव्य सुरक्षित राहणार आहे. 30 किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आज 50 टक्के लोक आहेत. 2030 च्या अखेरीस हे प्रमाण 57 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 67 टक्के तरुण आजही चांंगल्या भविष्यावर विश्वास ठेवतात, 15 ते 17 वयोगटातील मुले सर्वात आशावादी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या