Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री प्रणाली भालेरावशी 'टकाटक' गप्पा

अभिनेत्री प्रणाली भालेरावशी ‘टकाटक’ गप्पा

२०१९ मधल्या बॉक्सऑफिसवर कल्ला केलेल्या टकाटक या सिनेमातून अभिनेत्री प्रणाली भालेराव हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि सगळ्यांचं लक्ष देखील वेधून घेतलं. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर २६ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता होणार आहे, या निमित्ताने प्रणाली सोबत साधलेला हा खास संवाद

या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आणि अनेक पुरस्कारही मिळवले, हे आनंदी क्षण तुम्ही कसे सेलीब्रेट केले?

- Advertisement -

सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, पहिल्या दिवसापासूनच सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. सगळे थिएटर हाऊसफुल होते. प्रेक्षक सिनेमाला एवढा प्रतिसाद देतील असं वाटलं नाही, कारण सिनेमा प्रदर्शित होण्याआधी, बोल्ड विषय असल्यामुळे नेगेटिव्ह कमेंट्स येत होत्या. पण आम्ही सगळे खूप सकारात्मक होतो. आम्ही सिनेमा मध्ये काय दाखवत आहोत याची पूर्ण जाणीव होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांच्या कमेंट्समध्ये आम्हाला बराच फरक जाणवला. प्रेक्षक आमचं भरभरून कौतुक करत होते. आपल्या कुटुंबासोबत सिनेमा बघायला येत होते. प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद हा आमच्यासाठी एक पुरस्कारच होता. महिनाभर सिनेमा हाऊसफुल झाल्यावर आम्ही जोरदार सेलिब्रेशन केलं.

तुझ्या सहकलाकारासोबत तुझे अनेक बोल्ड सीन्स होते, या बद्दल तुला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला?

मराठी सिनेसृष्टीमध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण एवढे बोल्ड सीन्स असलेलं गाणं पहिल्यांदाच एका मराठी सिनेमा मध्ये दाखवण्यात आलं होत. श्रुती राणे हिने हे गाणं फार सुंदर गायलेलं आहे. १७ मिलिअन लोकांनी हे गाणं बघितलं आहे. बोल्ड सीन्स असल्यामुळे माझ्याही मनात थोडी भीती होती. पण गाणं प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे माझी भीती पळून गेली. अनपेक्षित प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला. भरपूर लोकांनी मला फोन, मेसेज करून गाणं छान असल्याचं कळवलं

झी टॉकीज २६ जुलै रोजी टकाटक सिनेमाचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर करणार आहे, या बद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील आणि तु तुझा दिवस कसा घालवणार आहेस?

हा सिनेमा पहिल्यांदाच टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्यामुळे मी फारच उत्साही आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी जसा प्रतिसाद थिएटर मध्ये दिला तसाच प्रतिसाद प्रेक्षक झी टॉकीजवर होणाऱ्या टकाटकच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला देतील, याची मला खात्री आहे. मी लोकांना एवढच सांगीन कि ज्यांनी हा सिनेमा अजून बघितला नाहीये त्यांच्यासाठी ही एक सोनेरी संधी आहे. या सिनेमामुळे तुमचं लॉकडाउन नक्कीच टकाटक जाईल याची मला खात्री आहे. मी गावी असल्यामुले मी सगळ्या गावकऱ्यांना घरी बोलावून हा सिनेमा दाखवणार आहे.

सगळं जग थांबलेलं आहे. या लॉकडाउनमधील तुझी एखादी टकाटक आठवण आहे का?

या संकटामुळे आपण सर्वजण घाबरलेले आहोत. एकमेकांची काळजी घेत आहोत. टकाटक सिनेमामुळे मला कायम सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळत राहते. यामुळे माझं लॉकडाउनसुद्धा टकाटक गेलं आहे. टकाटक सिनेमामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. टकाटकचा प्रवास अजूनही सुरूच आहे. मी दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत टकाटकचा उल्लेख होतोच. या सिनेमाचं मला एक भाग होता आलं हे खरचं माझं भाग्य आहे. सिनेमाची गाणी, ट्रेलर अजूनही प्रेक्षक मनापासून ऐकतात, बघतात. अशा अनेक बातम्या माझ्या पर्यंत पोहोचत असल्यामुळे माझ्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते.

सिनेमाच्या पडद्या मागील काही आठवणी आहेत का?

जेव्हा आम्ही मुंबई मध्ये शेवटचा सीन शूट करत होतो तेव्हा एका सीन मध्ये मी पूर्ण झोपून होते. माझ्या हातांना लागलेलं आहे असं दाखवायचं असल्यामुळे मला खाता येत नव्हतं, त्यामुळे भारत गणेशपुरे दादांनी मला त्यांच्या हातांनी भरवलं होतं. हि माझ्या साठी खूप छान आठवण आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या