Sunday, November 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाच्या वतीने आयोजित मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ च्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी झालेले सामंजस्य करार म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेवर उद्योगविश्वाने दाखविलेला मोठा विश्वास असल्याचे सामंत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात नवीन उद्योग सुरू करणे, विद्यमान उद्योगांचा विस्तार करणे किंवा नवीन गुंतवणूक आणणे यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य उद्योग विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. गुंतवणूकदारांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच उद्योग उभारणीची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ठाकरे बंधूंच्या जनमोर्चाच्या मार्गात बदल, आता ‘असा’ असेल मार्ग

राज्यातील औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी शासन आणि उद्योगविश्वाने एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांना अनुकूल वातावरण, आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य यांच्या बळावर महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य औद्योगिक राज्य बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही सामंत म्हणाले.

७० सामंजस्य करार
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ७० सामंजस्य करार झाले असून त्यांचे एकूण मूल्य १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त (सुमारे ९.९५ लाख कोटी) आहे. यापैकी ८८ अब्ज डॉलरचे करार उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाकडे, तर १२ अब्ज डॉलरचे करार एमएमआरडीएकडे आहेत.

ताज्या बातम्या

कळवण : होलसेल किराणा दुकानाच्या गोडाऊनला आग; कोट्यावधी रुपयांचा माल जळून...

0
कळवण | प्रतिनिधी Kalwan दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असतानाच कळवण शहराला रविवारी सकाळी मोठा धक्का बसला. शहरातील सबस्टेशन ते कळवण...