Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : ट्रेडिंगच्या करारनाम्याची खेळी, गुंतवणुकीवर डल्ला

Crime News : ट्रेडिंगच्या करारनाम्याची खेळी, गुंतवणुकीवर डल्ला

‘ग्रो मोअर’ फसवणूक प्रकरण || सावळे पुन्हा 12 दिवस पोलीस कोठडीत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चांगला परतावा मिळेल अशा आमिषाने नागरिकांकडून जमा केलेले कोट्यवधी रूपये भुपेंद्र राजाराम सावळे व त्याच्या साथीदारांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी वापरणार असल्याचा करारनामा करून दिला होता. मात्र ती रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान, सावळेला शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 12 दिवसांची (26 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

‘ग्रो मोअर’ कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहाता व शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. प्रारंभी सावळेला राहाता पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक झाली होती. आता त्याला शिर्डी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अनिल रामकृष्ण आहेर (रा. शिर्डी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादी व इतरांची एक कोटी 65 लाख 4 हजार रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. मात्र, गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविताना फसवणुकीची रक्कम 2 कोटी 55 हजार रूपयांवर गेली असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

YouTube video player

तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सावळेला गुरूवारी (14 ऑगस्ट) राहाता येथील विशेष एमपीआयडी न्यायालयासमोर हजर केले. तपासात उघड झाले आहे की, सावळे व त्याच्या साथीदारांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी वापरणार असल्याचा करारनामा करून दिला होता. मात्र ती रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याने त्या रक्कमेचा तपास करायचा आहे. ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या बँक खात्यातून सावळे यांच्या बँक खात्यात तब्बल 65 कोटी रूपये जमा झाले होते. त्यापैकी 23 कोटी रूपये परत करण्यात आले, मात्र उर्वरित 42 कोटी रूपयांचा विनियोग कुठे केला याचा तपास करायचा आहे.

शेअर मार्केट संदर्भातील ‘डिमॅट’ खात्यावरील व्यवहाराबाबत त्याच्याकडे चौकशी करणे आवश्यक आहे. ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या बँक खात्यातून इतर संस्थांना मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग झाल्याचे दिसून आले असून, ही रक्कम कोणाला व कोणत्या कारणासाठी देण्यात आली याचा तपास करून ती हस्तगत करण्यासाठी सहायक निरीक्षक आठरे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सावळेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...