मुंबई
करोनामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गुरुवारी शेअर बाजारात टेन्शन वाढलेे. एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख (Rs 3.95 lakh crore) कोटींचे नुकसान झाले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १११५ अंकांनी (Sensex plunged 1,115 points) घसरला आहे. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला. ही परिस्थिती अगदी मार्च महिन्यासारखीच निर्माण झाली आहे.
गुरुवारी बाजारातील कंपन्यांचे मूल्य (listed companies stood) 1,48,76,217.22 कोटी झाले. कालच्या तुलनेत त्यात 3.95 लाख कोटींची घसरण आहे.
बँकिंग, आयटी, ऑटो शेअर घसरले
शेअर बाजारातील बीएसई इंडेक्सचे सगळे शेअर खाली आले होते. संपूर्ण कारभाराच्या शेवटच्या तासात इंडसइंड बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी घसरले. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही टॉप लूझर्समध्ये होते. टाटा स्टील, इन्फोसिस, अँक्सिस बँक, मारुती,एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.