Monday, November 25, 2024
Homeक्रीडामोठी बातमी! ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटचा थरार अनुभवता येणार; IOC ने 'या' नव्या...

मोठी बातमी! ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटचा थरार अनुभवता येणार; IOC ने ‘या’ नव्या खेळांना दिली मंजुरी

मुंबई | Mumbai

२०२८ साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस (2028 Los Angeles Olympics) येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेट (Cricket Included In Olympics) खेळाचाही समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC च्या )बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कनव्हेंशन सेंटरमध्ये सध्या आयओसीची बैठक सुरु असून याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, लॉस एंजेलिस समितीने ऑलिम्पिकचा भाग होऊ शकणाऱ्या पाच खेळांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. या प्रस्तावानंतर आज क्रिकेटला ऑलिम्पिकसाठी मान्यता देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सन १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता त्यानंतर आता पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

‘नाशिक उडता’ पंजाब झालंय का? संजय राऊतांचा सवाल; ‘या’ तारखेला ठाकरे गटाचा मोर्चा

२०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसोबत, बेस बॉल, सॉफ्ट बॉल, फ्लॅग फुटबॉल लॅक्रॉसे आणि स्क्वॉश खेळांचा देखील सामावेश करण्यासाठी समितीने परवानगी दिली आहे. मात्र या सर्व नवीन खेळांच्या बाजूने आयओसी सदस्य देशांनी देखील मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी सोमवारी मतदार प्रक्रिया राबलवी जाईल त्यानंतर या खेळांचा २०२८ च्या लॉस एंजलेस येथील ऑलिम्पिक गेम्समधील समावेश निश्चित होईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने यासंदर्भातील अधिकृत पत्रक ९ ऑक्टोबर रोजी जारी केले होते. ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल असे सांगण्यात आले होते. “२ वर्ष आयसीसी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक समितीबरोबर चर्चा करत होती. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासंदर्भातील संपूर्ण तयारीनंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला. आता ही समिती बैठकीमध्ये यावर चर्चा करेल,” असे ९ तारखेला आयसीसीने सांगितले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या