Monday, April 28, 2025
Homeक्रीडाIPL 2020 : दिल्ली आणि हैद्राबादच्या संघाला मोठा धक्का

IPL 2020 : दिल्ली आणि हैद्राबादच्या संघाला मोठा धक्का

मुंबई | Mumbai

IPL स्पर्धा रंगात आलेली असतानाच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाला तगडा धक्का बसला आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या दिल्लीचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएलला मुकणार आहे. दुखापतीमुळे दोघेही स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत.

- Advertisement -

शनिवारी KKR कोलकात्याच्या संघाविरुद्ध (Kolkata Knight Riders) झालेल्या सामन्यात फील्डिंग करतेवेळी अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. आता ही दुखापत लवकर बरी होणारी नसल्यामुळे अमित मिश्रा पुढच्या सगळ्या सामन्यांना मुकणार आहे. KKR विरुद्धच्या सामन्यात दोनच ओव्हर टाकून झाल्यानंतर अमित मिश्राच्या बोटाला लागलं. त्याला मैदानावरून परत जावं लागतं. आता त्याच्या दुखापतीचं गांभीर्य स्पष्ट झालं आहे. तर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला ज्याची उणीव प्रकर्षानं जाणवली तो प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यंदाच्या IPL 2020मधून माघार घेत आहे. नितंबला ( Hip) झालेल्या दुखापतीमुळे त्यानं आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दुबईत झालेल्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे MIविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...