Sunday, September 15, 2024
Homeक्रीडाIPL 2020 : सामन्यापूर्वी SRH संघाला मोठा झटका

IPL 2020 : सामन्यापूर्वी SRH संघाला मोठा झटका

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 8 वा सामना आज खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात हा सामना खेळण्यात येणार आहे. यूएईतील अबुधाबी मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र हैदराबाद संघाला सामना सुरु होण्यापुर्वी धक्का बसला आहे.

संघातील अनुभवी फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) आजच्या सामन्यातही खेळताना दिसणार नाही. यापुर्वी झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने विलियम्सनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न दिल्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण नंतर वॉर्नरने सांगितले की, विलियम्सन दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याने पहिला सामना खेळला नाही. सोबतच त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्याचेही वॉर्नरने सांगितले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या