Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाIPL 2020 : यामुळे दिनेश कार्तिकने सोडलं KKR चे कर्णधारपद !

IPL 2020 : यामुळे दिनेश कार्तिकने सोडलं KKR चे कर्णधारपद !

मुंबई | Mumbai

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या (Kolkata Knight Riders) कर्णधारपदाचा दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ओएन मॉर्गन (Eoin Morgan) कोलकाताचा नवीन कर्णधार असेल. याबद्दल शुक्रवारी(१६ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स संघाने माहिती दिली आहे. कार्तिक २०१८ च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत होता.

- Advertisement -

कार्तिकने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनी माहिती दिली. एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत गरजेची असते. आम्ही त्याच्या निर्णयामुळे हैराण झालो आहोत. पण आम्ही त्याच्या या निर्णयाचा सन्मान करतो. दिनेश कार्तिकने नेहमीच पहिले टीमचा विचार केला, असं वैंकी मैसूर म्हणाले.

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात दिनेश कार्तिकची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मागच्या मॅचमध्ये तो फक्त 1 रन करुन आऊट झाला. यंदाच्या मोसमात 7 इनिंगमध्ये त्याने 108 रन केले आहेत, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठीच कार्तिकने नेतृत्व सोडल्याचं बोललं जात आहे. या हंगामात कोलकात्याने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता 8 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदात्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Case) आज ईडीच्या (ED) पथकाने शहरात महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागात...