Friday, March 28, 2025
Homeक्रीडाआयपीएल वेळापत्रक जाहीर

आयपीएल वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली | New Delhi –

क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्‍या

- Advertisement -

मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचा रणसंग्राम होणार आहे.

करोना संकटामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. आयपीएलच्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल.

तसेच 24 सामने दुबई, 20 सामने अबूदाबी आणि 12 सामने शारजामध्ये होणार आहेत. बीसीसीआयने साखळी सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक नंतर जाहीर कऱण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण; हत्या की...

0
मुंबई | Mumbaiअभिनेता सुशांत राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने पाच वर्षानंतर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई...