नाशिक । सलिल परांजपे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय संपादन करून २०२१ या नवीन वर्षाची धडाक्यात सुरुवात केल्यांनतर आता टीम इंडिया मायदेशात परतली आहे. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. आणि आता सर्व क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी समजलं जाणारं आयपीएल अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलं आहे.
येत्या १८ फेब्रुवारीला आयपीएलच्या १४ व्या हंगामाची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यानेच खरे तर आयपीएलचे १४ वे नवीन पर्व सुरु होणार आहे. सर्व आठही संघांनी स्पर्धेचे अगदी जय्यत तयारी सुरु केली आहे. आपल्या संघातील वरिष्ठ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तर स्पर्धेच्या १३ व्या हंगामात अपयशी ठरलेल्या सर्व खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे
चला तर मग कोणत्या संघाने किती खेळाडू रिटेन आणि रिलीज केले आहेत ते पाहूया. दरवर्षी आयपीएल स्पर्धेचा लिलाव हा नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात पार पडतो. पण कोरोना विषाणूच्या महामारीमुळे हा लिलाव लांबणीवर पडला आहे.
ट्रेड प्रक्रियेद्वारे बदललेले खेळाडू : रॉबिन उत्तपा राजस्थान रॉयल्स , नवा संघ चेन्नई सुपरकिंग्ज , हर्षल पटेल आणि डॅनियल स्लॅम्स दिल्ली कॅपिटल्स नवा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूर.
1 चेन्नई सुपरकिंग्ज
संघातील कायम खेळाडू : सुरेश रैना , धोनी , डीजे ब्रावो , अंबाती रायडू , के एम असिफ दीपक चाहर , शार्दूल ठाकूर , फाफ डू प्लेसिस , इम्रान ताहीर , जगदीशन , कर्ण शर्मा , लुंगी इंगिडी , मिचेल संतनेर , रविंद्र जडेजा , ऋतुराज गायकवाड , सॅम करण , जोश हेझलवूड , आणि आर साई किशोर
रिलीज खेळाडू : हरभजनसिंग , केदार जाधव , मुरली विजय , पियुष चावला , मोनू कुमार , शेन वॉटसन
2 दिल्ली कॅपिटल्स :
कायम खेळाडू : अजिंक्य राहणे , श्रेयस अय्यर , पृथ्वी शॉ , शिखर धवन , रिषभ पंत , आवेश खान , अमित मिश्रा , अक्षर पटेल , इशांत शर्मा , कांगिसो रबाडा , आर अश्विन , सिमरोन हेटमायर , मार्कस स्ट्रोइनीस , ललित यादव , अनरिक नोकिया , प्रवीण दुबे , क्रिस वोक्स
रिलीज खेळाडू : अलेक्स कैरे , किमो पॉल , तुषार देशपांडे , संदीप लॅम्मीचाने , मोहित शर्मा , जेसन रॉय
3 किंग्ज इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल , क्रिस गेल , मयंक आगरवाल , निकोलस पुरण , दर्शन नळकांडे , हरप्रीत ब्रार , अर्षदिपसिंग , मंदीपसिंग , मोहंमद शमी , मुरुगन अश्विन , दीपक हुडा , सर्फराजखान , ईशान पुरेल , रवी बिष्णोई , क्रिस जॉर्डन , प्रबसिम्रनसिंग
रिलीज खेळाडू :हार्डस , व्हिजोलिन , ग्लेन मॅक्सवेल , शेल्डन कॉट्रेल , जिमी निशम , के गौतम , करुन नायर , जे सूचित , तेजेंदरसिंग
4 केकेआर : ऑईन मॉर्गन , दिनेश कार्तिक , नितीश राणा , शुभमन गील , आंद्रे रसेल , सुनील नारायण , कमलेश नागरकोटी , शिवम मावी , लौकी फेर्गसन , कुलदीप यादव , प्रसिद कृष्णा , रिकुसिंग , पॅट कमिन्स , राहुल त्रिपाठी , वरुण चक्रवर्ती , टीम सैफरीत
रिलीज खेळाडू : क्रिस ग्रीन , हरी गनी , एम सिद्धार्थ , निखिल नाईक , सिद्धेश लाड , टॉम बोनटन
5 मुंबई इंडियन्स : क्रिस लीन , रोहित शर्मा , क्विंटन डिकॉक , सूर्यकुमार यादव , आदित्य तारे , अनमोलप्रीतसिंग , अनुकूलरॉय , हार्दिक पंड्या , कृणाल पंड्या , किरॉन पोलार्ड , ईशान किशन , जयंत यादव , राहुल चाहर , जसप्रीत बुमराह , ट्रेंट बोल्ट , सौरभ तिवारी , मोहसीनखान
रिलीज खेळाडू : जेम्स पॅटिन्सन , मिचेल मॅक्लेनघन , बळवंतराय , दिगविजय देशमुख , नेथन कुल्तेरनैल , लसिथ मलिंगा , रुदरफोर्ड ,
6 राजस्थान रॉयल्स :जोस बटलर , संजू सॅमसन , महिपाल लोमरोर , बेन स्ट्रोक्स , जोफ्रा आर्चर , मयंक मार्कंडे , मनन वोहरा , राहुल टेवटिया , रियन प्राग , श्रेयस गोपाल , जयदेव उनाडकट , यशस्वी जयस्वाल , अनुज रावत , कार्तिक त्यागी , डेविड मिलर , अँड्रू टाय
रिलीज खेळाडू : स्टीव्ह स्मीथ , आकाशसिंग , अनिरुद्ध जोशी , ओशन थॉमस , शशांकसिंग , अंकित राजपूत , टॉम करण आणि वरुण एरन
7 सनराईझर्स हैद्राबाद : डेविड वॉर्नर , अभिषेक शर्मा , बेसिल थंपी , मनीष पांडे , केन विलियम्सन , जॉनी बेरस्टो , भुवनेश्वर कुमार , मोहंमद नबी , संदीप शर्मा , रशीद खान , खलील अहमद , टी नटराजन , शहाबाज नदीम , श्रीवत्स गोस्वामी , सिद्धार्थ कौल , विजय शंकर , विराटसिंग , वृद्धिमान सहा , प्रियम गर्ग , मिचेल मार्श , जेसन होल्डर , अब्दुल समद
रिलीज खेळाडू : बिली स्टॅन्लेक , संदीप बावनका , फेबियन अलेन , संजय यादव , पृथ्वीराज यारारा
8 रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : देवदूत पडिकल , विराट कोहली , डिव्हिलिअर्स , मोहंमद सिराज , नवदीप सैनी , वॉशिंग्टन सुंदर , युझवेन्द्र चहल , जोश फिलिपे , पवन देशपांडे , शहाबाज अहमद , केन रिचडसन , एडम झाम्पा
रिलीज खेळाडू : क्रिस मॉरिस , शिवम दुबे , एरन फिंच , उमेश यादव , डेल स्टेन , मोईन अली , पार्थिव पटेल , इसरू उदाना , आणि गुरकिरात मान