Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIPL 2021 : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स दुबईला जाणार; पण...

IPL 2021 : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स दुबईला जाणार; पण…

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ चा (IPL 2021) निर्णायक टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईत (UAE) सुरु होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात दुबईत सामना होणार आहे….

- Advertisement -

आयपीएल २०२१ साठी सर्वच संघांनी सध्या जोरदार तयारी सुरु केली आहे. चेन्नई सुपर किंग्स (chennai super Kings) या निर्णायक टप्प्यासाठी सध्या चेन्नईत दाखल झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्स येत्या शुक्रवारी दुबईला रवाना होणार असल्याचे बोलले जात होते.

चेन्नई सुपर किंग्स संघाप्रमाणे पाच वेळा विजेतेपद भूषविलेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ शुक्रवारी दुबईला रवाना होणार आहे. मात्र दोन्ही संघांना युएई सरकारकडून अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही संघांना सरकारच्या अंतिम निर्णयाची अद्याप वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्स बबल टू बबल ट्रान्सफर असले तरी त्यांना युएई सरकारच्या नियमानुसार आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्स संघाचे सर्व शिलेदार सध्या बायो-बबलमध्ये आपला कसून सराव करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

घणसोली येथील रिलायन्स क्रिकेट पार्क मैदानावर मुंबई इंडियन्स संघाचे सर्व शिलेदार कसून सराव करत आहेत. आपला विलगीकरणाचा कालावधी संपवून दोन आठवडे मुंबई इंडियन्स संघाचे सगळे खेळाडू आपला सराव करत आहेत.

आयपीएल २०२० च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघ ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. यंदाच्या वर्षी त्याच ठिकाणी मुंबई इंडियन्स राहणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या