Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाIPL 2021 : सिंगापूरच्या पहिल्या वहिल्या खेळाडूचे आयपीएलमध्ये पदार्पण; 'या' संघाशी झाला...

IPL 2021 : सिंगापूरच्या पहिल्या वहिल्या खेळाडूचे आयपीएलमध्ये पदार्पण; ‘या’ संघाशी झाला करार

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ चा (IPL 2021) निर्णायक टप्पा सुरू होण्यासाठी आता अवघे २० दिवस शिल्लक राहिले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) संघाने आपल्या संघात श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga), दुशमंत चमिरा (Dushmantha Chameera) आणि सिंगापूरचा क्रिकेटपटू टीम डेविड (Tim David) याचा आपल्या संघात समावेश केला आहे…

- Advertisement -

आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात सिंगापूरकडून खेळणारा टीम डेविड हा पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. २५ वर्षीय टीम डेविडने सिंगापूरकडून १४ टी २० सामन्यात आपला सहभाग नोंदवला आहे.

त्याचप्रमाणे बिग बॅश लीग (Big Bash League) आणि पीएसएलमध्ये (PSL) त्याने सहभाग घेतला आहे. श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगा याने २२ टी २० सामने खेळले आहेत. यात त्याने ६. ५६ च्या इकॉनॉमी रेटने प्रतिस्पर्धी संघाला धावा दिल्या आहेत. तर ३३ बळी टिपले आहेत. तळाला फलंदाजी करून वेगाने धावा जोडण्याची त्याच्यात क्षमता आहे.

बंगळूर संघाकडून खेळणारे फिन अलेन आणि स्कॉट कुगेलीन न्यूझीलंड संघाकडून बांगलादेशविरुद्ध मालिकेत खेळणार आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू ॲडम झाम्पा, केन रिचडसन आणि डॅनिअल स्लॅम्स यांनी नुकतीच स्पर्धेतून माघार घेतली आहे.

बंगळूर क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीच यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बंगळूर संघाचे (RCB) पुढचे प्रशिक्षक कोण? असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मात्र आता बंगळूर संघांची चिंता मिटली आहे. संघाचे संचालक माईक हेसन आता मुख्य प्रशिक्षक पदाची जवाबदारी पार पाडणार आहेत. त्यांनी यापूर्वी न्यूझीलंड आणि पंजाब किंग्जच्या मुख्य प्रशिक्षक पदांची सूत्रे सांभाळली आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या