मुंबई | Mumbai
दि. १२ आणि १३ फेब्रुवारीदरम्यान बंगळूरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आयपीएल १५ च्या (IPL 15) मेगा लिलावाचे (Mega Auction) वेध लागले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत टी २० क्रिकेटपैकी एक आयपीएल (IPL) नेमकी कोठे आयोजित होणार? असा प्रश्न सध्या चाहत्यांमध्ये जोर धरून आहे…
बीसीसीआयने (BCCI) तयार केलेल्या प्लॅन बीनुसार आयपीएलचे साखळी सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डिवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई गरज पडल्यास पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि बाद फेरीचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यासाठी बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बीसीसीआयच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीनंतर एका अधिकाऱ्याने भारतात करोनाची (Corona) परिस्थिती नियंत्रणात असल्यास संपूर्ण स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा आमचा विचार आहे, असे स्पष्ट केले होते.
भारतात करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
सलिल परांजपे, नाशिक.