Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : अर्शदीप सिंगने BCCIला दिला मोठा झटका, सेकंदात केले लाखोंचे...

IPL 2023 : अर्शदीप सिंगने BCCIला दिला मोठा झटका, सेकंदात केले लाखोंचे नुकसान

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ३१ व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर १३ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमधील या लढतीत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघ सामन्यात टिकून राहिले.

- Advertisement -

पण, अखेरच्या षटकात अर्शदीपने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे संपूर्ण खेळच बदलून गेला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावा हव्या होत्या. पण, अर्शदीपने सलग दोन चेंडूत दोन विकेट घेत पंजाबला सामना जिंकवून दिला. अर्शदीपने अखेरच्या षटकात ज्याप्रकारे धावा वाचवल्या आणि आपल्या बेदक यॉर्करने दोन वेळा स्टंप मोडले.

MPSC संयुक्त परीक्षेचे ९० हजारांपेक्षा जास्त हॉल तिकीट Telegram वर लीक… आयोगाचे काय स्पष्टीकरण ?

अर्शदीपच्या या दोन चेंडूंवर बीसीसीआयला 30 लाख रुपये मोजावे लागले आहे. वास्तविक एलईडी स्टंप आणि जिंग बेल्सच्या सेटची किंमत 30 लाख रुपये आहे. अर्शदीप सिंगने दोन स्टंप तोडल्यामुळे बीसीसीआयला सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले.

हरणाला वाचवण्याच्या नादात पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक 55 धावा केल्या.

तुम्हाला माहिती आहे का? ‘स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

मुंबई इंडियन्सकडून पियुष चावला आणि कॅमेरून ग्रीनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 67 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक चार विकेट घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या