Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाIPL-2023 : CSK vs GT- चेन्नई-गुजरातमध्ये आज महाझुंज

IPL-2023 : CSK vs GT- चेन्नई-गुजरातमध्ये आज महाझुंज

अहमदाबाद । वृत्तसंस्था Ahemdabad

आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता आज मिळणार असून त्यासाठी चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये अंंतिम थरार रंगणार आहे.चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर 1 मध्ये गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण गुजरातने क्वालिफायर 2 मध्ये मुंबईचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

- Advertisement -

31 मार्चपासून सुरु झालेला रनसंग्राम 28 मे रोजी थांबणार आहे. 10 संघामध्ये दोन महिन्यापासून लढत सुरु आहे. चेन्नई की गुजरात कोणता संघ चषक उंचावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे अंतिम सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे होणारा हा सामना उद्या (रविवार) सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

चेन्नई पाचव्यांदा चषकावर नाव कोरणार की गुजरात दुसर्‍यांदा जेतेपद पटकावणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. चेन्नईला सर्वाधिक चषक जिंकणार्‍या मुंबईची बरोबरी करण्याची संधी आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा चषकावर नाव कोरले. आता चेन्नईला याची बरोबरी करण्याची संधी आहे.

पावसामुळे सामना रद्द झाला तर…

आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एम. एस. धोनी आणि हार्दिक पांड्या आमनेसामने येणार आहेत. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर यंदाच्या आयपीएलच्या जेतेपदाचा कोणता संघ मानकरी ठरेल, याबाबत जाणून घेऊ या

* प्ले ऑफ सामने आणि फायनलचे नियम खूप वेगळे आहेत. आयपीएलच्या लीग राऊंडमध्ये एखादा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक अंक दिला जातो. अशावेळी एक प्रश्न उपस्थित होतो की, जर आयपीएलच्या फायनल सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन बनेल.आयपीएल नियमांनुसार आयपीएल फायनलसाठी यावेळी रिझर्व्ह डे ठेवलेला नाही. यामुळे निर्धारीत सामन्यावेळी आयपीएल 2023 च्या फायनल विजेत्या संघाची घोषणा केली जाईल.

* चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 120 मिनिटांची वेळ उपलब्ध असेल. आयपीएल 2023 च्या फायनलसाठी कट ऑफ टाईम जर 7.30 वाजता सुरु झाला, तर 5 षटक प्रति साइड गेमसाठी 11.56 वाजेपर्यंत असेल. जर हे 8 वाजता सुरु झाले, तर कट ऑफ टाईम 12.26 पर्यंत असेल. परंतु, सामन्यात एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, तर ग्रुप स्टेजमध्ये गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाला विजेता घोषित केला जाईल.

* आयपीएल 2023 च्या लीग राऊंडमध्ये 10 सामने जिंकून गुजरातचा संघ गुणतालिकेत 20 अंकांनी अव्वल स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या 14 सामन्यांमध्ये 8 सामने जिंकून 17 गुण मिळवले आहेत. त्यामुळे सीएसके दुसर्‍या स्थानावर आहे. अशातच फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला तर, गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसर्‍यांदा चॅम्पियन बनेल.

यापूर्वीचे 15 विजेते

राजस्थान 2008

डेक्कन चार्जस 2009

चेन्नई 2010

चेन्नई 2011

कोलकाता नाईट रायडर्स 2012

मुंबई इंडियन्स 2013

कोलकाता नाईट रायडर्स 2014

मुंबई इंडियन्स 2015

सनरायझर्स हैदराबाद 2016

मुंबई इंडियन्स 2017

चेन्नई 2018

मुंबई इंडियन्स 2019

मुंबई इंडियन्स 2020

मुंबई इंडियन्स 2021

गुजरात 2022

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या